* आ. महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त "आरोग्याचा महायज्ञ" ही संकल्पना आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने 20 मार्च ते 27 मार्च 2025 या कालावधीमध्ये कडाव, कशेळे, कंळंब, खांडस, आंबिवली, नेरळ, मोहिली आदी गावांत राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत कडाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कडाव आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून विधानसभा प्रमुख प्रसाद मनोहर थोरवे आणि कर्जत तालुका आरोग्य अधिकारी नितीन गुरव यांनी हजेरी लावली होती. त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत भविष्यातही असे आरोग्य शिबिरे सातत्याने राबविण्याचे आश्वासन दिले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख सुदाम पवाळी, तालुका संघटक सुनील रसाळ, तालुका संपर्क प्रमुख हर्षद विचारे, विभाग प्रमुख प्रफुल म्हसे, तालुका संघटक श्याम पवाळी, प्रभाकर भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉं. नितीन गुरव, डॉं. हरपुडे मॅडम, सीआरपी (CRP) गंगावणे मॅडम यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनात विशेष भूमिका बजावली.
रायगड हॉस्पिटलचे सिईओ (CEO) पटेल सर तसेच रायगड हॉस्पिटलचे सर्व प्रमुख डॉंक्टर आणि स्टाफ यांनी या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनचे सर्व सदस्य यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची विशेष टीम नागरिकांच्या सेवेसाठी उपस्थित आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशीच अनेक रुग्णांनी तपासणी करून घेतली व गरजू रुग्णांनी शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. या सुवर्णसंधीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.