अजीव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिक महिलांना मोफत अपघाती विमा योजना

वसई / नरेंद्र एच. पाटील :- माजी स्थायी समिती सभापती अजीव पाटील व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विरार पूर्व येथील बविआ पुरस्कृत रघुवीर ठाकूर भावोजी मित्र मंडळातर्फे घरकाम करणाऱ्या श्रमिक महिलांसाठी मोफत भारतीय डाक विभागाची महत्त्वाकांक्षी  345  मध्ये 5 लाख रुपयांची  अपघाती सुरक्षा विमा योजना राबविण्यात आली.

8 व 9 मार्च रोजी महिलांसाठी मोफत राबविण्यात आलेल्या या योजनेचा लाभ 144 गरजू महिलांनी घेतला. हे अपघाती विमा कार्ड वाटप सभापती, नगरसेवक  चिरायु प्रणव चौधरी, युवा नेते प्रतिकदादा ठाकूर, प्रणव चौधरी तसेच ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. बविआ तर्फे महिला दिनानिमित्त वसई तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

Post a Comment

Previous Post Next Post