रायगड / प्रतिनिधी :- श्रीवर्धन येथील वेळास आगर येथे अखंड भंडारी समाज वेळास आगर यांच्या वतीने वेळास आगर व मुळ वेळासमधील ग्रामस्थ आणि महिला यांच्या सुरक्षतेसाठी शासनाच्या पंतप्रधान जीवनज्योती योजना व पंतप्रधान सुरक्षा योजना या दोन्ही योजनांचे शिबिर शनिवार, १ मार्च २०२५ रोजी भंडारी समाज सभागृह वेळास आगर येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी माजी सरपंच आशुतोष पाटील, भंडारी समाजाचे अध्यक्ष रंजीत मुरकर, अमृता राम चांदोरकर तसेच पंतप्रधान जीवनज्योती योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. तसेच 18 वर्ष वयोगटातील तरुण मुले-मुली देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
