* पत्रकार शिवाजी जाधव यांचे कोकण आयुक्तांना निवेदन
खोपोली / प्रतिनिधी :- शहरातील वाढत्या अतिक्रमणाविरोधात खोपोली येथील पत्रकार शिवाजी जानू जाधव यांनी कोकण विभाग आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. खोपोली नगर परिषद हद्दीत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून प्रशासनाकडे वारंवार अर्ज, तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
खोपोली शहरातील रस्ते, फुटपाथ आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण वाढल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या संदर्भात नगर परिषदेकडे तक्रार करूनही प्रशासन डोळेझाक करीत असल्याचा आरोप पत्रकार शिवाजी जाधव यांनी केला आहे. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांनी तातडीने याची दखल घेऊन चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी रायगड जिल्हाधिकारी आणि खालापूर तहसीलदार यांनाही निवेदन देण्यात आले आहे. जर तातडीने अतिक्रमण हटवले गेले नाही, तर मोठे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ही पत्रकार जाधव यांनी दिला आहे.
