त्यागाचे प्रतिक ती, शौर्याची ढाल ती!
जगभर तिची किर्ती, अशी ती विश्वशक्ती !!
कर्तृत्व, नेतृत्व कुठे कमी नाही,
सर्व क्षेत्रात पुढे नारी कशातच कमी नाही!
ज्योतिबाची सावित्री आहे, क्रांतीची ज्योती,
जगभर तिची किर्ती, अशी ती विश्वशक्ती !!
जिच्या हाती होते फक्त चुल आणि मुल,
लाखो जनतेची आई बाबासाहेबांची रमाई!
समाजाला आदर्श देणारी ती त्यागाची मुर्ती,
जगभर तिची किर्ती, अशी ती विश्वशक्ती !!
रणरागिणी स्वराज्याच्या जननी जिजामाता,
घडविला तू असा छावा महाराष्ट्राचा विधाता !
घडविला इतिहास तू प्रत्येक पानावरती,
जगभर तिची किर्ती, अशी ती विश्वशक्ती !!
घराला स्वर्ग करते ती नारीशक्ती,
देश चालवते आज ही महिला शक्ती!
शिक्षक, डॉंक्टर, वकील ती समाजात घडवते क्रांती,
जगभर तिची किर्ती, अशी ती विश्वशक्ती !!
- मानसी कांबळे
निवासी संपादक
दै. कोकण प्रदेश न्यूज
खोपोली, महाराष्ट्र.
