खालापूर / दिनेश पाटील :- 4 मार्च ते 11 मार्च या दिवसांत पूर्ण भारत देशात सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. औद्योगिक वसाहतीमध्ये या सुरक्षा सप्ताहला मोठे महत्व आहे. या सुरक्षा सप्ताहनिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. खालापूर तालुक्यातील होनाड ग्रामपंचायत हद्दीतील प्रसोल केमिकल्समध्येही अशाच प्रकारे सुरक्षा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो. याही वर्षी सुरक्षा सप्ताहची सांगता करताना विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये क्रिकेट, कॅरम, बुद्धिबळ, सुरक्षा विषयावर चित्रकला, रांगोळी स्पर्धांचा ही यात सहभाग होता. कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी झालेल्या कामगारांना सन्मानित करण्यात आले. तसेच सुरक्षा विषयावर पथनाट्यही कामगारांनी सादर केले. उपस्थित पाहुण्यांनी यावेळी कामगारांचे भरभरून कौतुक करीत त्यांना प्रोत्साहित केले. या कार्यक्रमकरीता होनाडचे सरपंच प्रकाश पाटील, पोलिस निरीक्षक शीतल राऊत, डायरेक्टर निशिध भाई यांसह कंपनी व्यवस्थापन आणि कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते.
