आंबिवली येथे विठ्ठल रखुमाई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा

खालापूर / प्रतिनिधी :- आंबिवली येथे असलेले विठ्ठल रखुमाई मंदिर जिर्ण झाल्यामुळे या देवाळाचा जिर्णोधार करुन पुन्हा नव्याने बांधण्यात आले. आज शुभ मुहुर्तावर पुजा, होम, अभिषेक आणि मंत्र घोष व धार्मिक विधीच्या माध्यमातून आंबिवली येथे या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पहाटेपासून या ठिकाणी मंगलमय वातावरण असल्याचे पहावयास मिळाले.        

ग्रामीण भागात आज ही भारतीय संस्कृती जोपासल्याचे पहावयास मिळत आहे. आज पहाटेपासून या ठिकाणी वारकरी यांचा उत्साह पहावयास मिळत होता. सकाळी गावातून पाळखी फिरविण्यात आली. यावेळी तरुण, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. ज्ञानोबा माउली तुकाराम म्हणत टाळ मृदुर्गांच्या स्वरात येथील वातावरण भक्तीमय झाल्याचे पहावयास मिळाले.          

या ठिकाणी विठ्ठल रखुमाई यांची सुंदर अशी रांगोळी रेखाटण्यात आली. तसेच येथील मंदिर फुलांनी सजविण्यात आल्याचे पहावयास मिळाले. आज या मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्यामुळे सर्वत्र ठिकाणी आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे भजन, किर्तन असे या कार्यक्रमाचे स्वरुप या ठिकाणी पहावयास मिळाले.

Post a Comment

Previous Post Next Post