* इच्छुक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात
रायगड / प्रतिनिधी :- उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन येथील 1 शासकीय जुने जीप वाहन क्रमांक MH 06/ AA 0247 मोटर वाहन उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन येथे आहे, त्या स्थितीत जेथे आहे तेथे व जशी आहे तशी या तत्वावर लिलावाद्वारे विक्री करावयाची आहे. याकरिता इच्छुक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील यांनी केले आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पेण रायगड यांच्याकडून वाहनाची अपसेट किंमत रुपये 45000/- एवढी कळविलेली आहे. लिलावाकरिता निविदा व अनामत रक्कम भरण्याचा कालावधी 17 मार्च 2025 सकाळी 11 वाजल्यापासून ते 24 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत राहील. प्राप्त निविदा 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन यांचे दालन, उपविभागीय अधिकारी कार्यालय श्रीवर्धन येथे उघडण्यात येतील.