माळेगाव कारखान्यावर जागरण गोंधळ

* राष्ट्रवादी शरदचंद्र पवार बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या वतीने आंदोलन

बारामती / प्रतिनिधी :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनेलच्या वतीने बारामती तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून उसाच्या उत्पादन खर्चात वाढ होऊनही, उसाच्या दरात अपेक्षित वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

उसाला योग्य आणि किफायतशीर दर मिळावा. किमान आधारभूत किंमत, एफआरपी एकररकमी मिळावी या प्रमुख मागण्यांसह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी माळेगाव कारखान्याने बांधलेले आणि एसटीपी आणि ईटीपी प्लांट केवळ शेतकऱ्यांचे पैसे खाण्यासाठीच बांधले असल्याचा आरोप सभासदांकडून करण्यात आला.

माळेगाव कारखान्यावर तुतारी वाजणार असे माळेगाव कारखाना येथील आंदोलनात पूर्ण ताकदीने कारखान्याची निवडणूक लढविणार असल्याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बोलताना दिसून आले .

Post a Comment

Previous Post Next Post