उल्हासनगर / प्रतिनिधी :- प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर महानगरपालिका अग्निशमन विभागातर्फे १८ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता उल्हास विद्यालय, उल्हासनगर येथे आगीपासून होणारे धोके, आग लागण्याची कारणे व उपाययोजना याविषयी व्याख्यान व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे नेतृत्व मुख्य अग्निशमन अधिकारी सुरेश वॉवे यांनी केले. कार्यक्रमास अति. आयुक्त किशोर गवस, कार्यकारी अभियंता हनुमंत खरात, प्रभाग अधिकारी मनिष हिवरे यांची उपस्थिती होती.
* आग लागल्यास काय करावे ?
प्रशासक तथा आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी आपत्ती निर्माण झाल्यास तातडीने करावयाची कार्यवाही, नागरिकांनी घ्यावयाची दक्षता आणि स्वच्छतेविषयी उपस्थितांना महत्वाचे मार्गदर्शन केले.
* मुख्य अग्निशमन अधिकारी यांचे मार्गदर्शन :-
सुरेश वॉवे यांनी आगीचे संभाव्य धोके, आग लागण्याची कारणे आणि आग विझवण्यासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
* प्रात्यक्षिके व शिक्षक-विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग :-
अग्निशमन विभागाने आगीच्या वेळी करावयाची तातडीची उपाययोजना आणि विविध अग्निशमन तंत्रांची प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आवश्यक ज्ञान मिळवले.
* उद्दिष्ट :-
या उपक्रमाद्वारे उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन उपाययोजना याविषयी जनजागृती वाढवून नागरिकांना सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्यात आले.
