बहुजन विकास आघाडी आणि विराट फाउंडेशन तर्फे खाद्य महोत्सव व स्त्री सन्मान सोहळा संपन्न

वसई / नरेंद्र एच. पाटील :- बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व विराट फाउंडेशनच्या  माध्यमातून लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकुर, प्रथम महापौर राजीव पाटील, माजी आमदार क्षितिज ठाकूर, संघटक सचिव अजीव पाटील, युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ ठाकुर, संघटक सचिव नगरसेवक हार्दिक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय भारतीताई देशमुख स्मृतिप्रित्यर्थ जागतिक महिला दिन विशेष “स्त्री सन्मान“ सोहळा व खाद्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या खाद्य महोत्सवांमध्ये ५० महिलांनी विविध प्रकारचे स्टॉल लावले होते. यावेळी महिलांनी विविध प्रकारे आपली कलागुण सादर केली.  तसेच या सोहळ्यात ४० महिलांचा त्यांच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबद्दल "स्त्री सन्मान" सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.  कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलांनी डिजेच्या तालावर नाचत आनंदोत्सव साजरा केला. या सोहळ्यास भारतीताई देशमुख यांची कन्या गौरी देशमुख व तिची कन्या यांनी आवर्जून उपस्थित लावली होती तसेच माजी नगराध्यक्षा कांताताई पाटील, माजी नगरसेविका वासंती पाटील, रिटा सरवैय्या, सुरेखा कुरकरे व विभागातील महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या. हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. या प्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली त्याचसोबत जेष्ठ नागरिक, महिला पुरुष, लहान मुलांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम यशस्वी आणि उत्साहात पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post