छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव जोपासणारे आदर्श राजे - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई / प्रतिनिधी :- कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही एका धर्मांविरुद्ध नव्हते. मुस्लिमांविरुद्ध त्यांनी कोणत्याच पद्धतीने कधीही द्वेष केला नाही. त्यांच्या सैन्यात, प्रशासनात मुस्लिमांना गुणवत्तेचा आधारावर स्थान देण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे आदर्श राजे होते, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया देताना ना. रामदास आठवले यांनी इतिहासाचा दाखला देत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मुस्लिमांना त्यांच्या गुणवत्तेनुसार स्वराज्याच्या प्रशासनात आणि सैन्यात मानाचे, विश्वासाचे स्थान दिले असल्याची माहिती दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात धर्म हा निकष न ठेवता केवळ गुणवत्ता हाच निकष लावून छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्य उभारले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मन हे मानवतेचा सागर होते. त्यामुळे त्यांनी आपल्या स्वराज्यात अनेक अशा घटना घडल्या आहेत की, ज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा मानवतेचा दृष्टिकोन दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वधर्मसमभाव आणि मानवता शिकविली असून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post