शेतकऱ्यांना अनोळखी लिंक न उघडण्याचे आवाहन

रायगड / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी. एम. किसान) योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान लिस्ट एपीके किंवा पीएम किसान एपीके या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम गायब होत आहे. शेतकऱ्यांनी वरील संदेशाची लिंक उघडू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post