* तंत्रज्ञानात स्वयंमूल्यमापन...20 व 21 मार्च रोजी राष्ट्रीय हॅकेथॉन हॅक टू क्रॅक 2.0 स्पर्धेचा शुभारंभ
खालापूर / साबीर शेख :- खालापूर कुंभिवली येथील NAAC (A+) मान्यताप्राप्त विश्वनिकेतन इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये 20 व 21 या दोन दिवशी राष्ट्रीय हॅकेथॉन हॅक टू क्रॅक 2.0 स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण तत्वानुसार उच्च शैक्षणिक संस्था अध्यापन शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच स्वयंमूल्यमापन नवकल्पना आत्मसात करण्यासाठी 36 तासांत अभियांत्रिकी प्रात्यक्षिके करून नवनवीन संशोधन, उपक्रम तज्ज्ञ परीक्षकांच्या निगराणीखाली मुल्यांकन करून विजेते निवडले जातात.
या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक राजेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विशेष आमंत्रित मार्गदर्शक पाहुणे म्हणून रिलायन्स जिओचे डॉं. मुनीर सय्यद ही उपस्थित होते. विश्वनिकेतन संस्थापक डॉं. एस. एस. इनामदार, प्राचार्य डॉं. बी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉं. शंकर कदम, डायरेक्टर पीबीएल सीओई डॉं. विकास शिंदे, हॅकॅथॉनचे कन्व्हेनर डॉं. अंकुश पवार व अन्य विश्वनिकेत व्यवस्थापन शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांच्यातील पोकळी भरून काढण्यासाठी अशा स्पर्धां महत्वाची असल्याचे मत राजेश चौगुले यांनी व्यक्त केले तर डॉं. मुनीर सय्यद यांनी प्रोजेक्ट बेस लर्निंग मुलांसाठी कशी फायदेशीर आहे, याची सविस्तर माहिती दिली. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 400 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. येणारे 36 तास हे विद्यार्थी परीक्षकाने सांगितलेल्या सूचनांचे पालन करून सोसायटीसाठी फायदेशीर होतील यासाठी नवनवीन प्रोजेक्ट्स बनविणार असल्याचे या हॅकॅथॉनचे समन्वयक डॉं. अंकुश पवार यांनी सांगितले.