खालापूर तालुकास्तरीय भात पीक स्पर्धेत हभप कानिफनाथ पारठे द्वितीय

खालापूर / सुधीर माने :- कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत तालुक्यात भात पीक स्पर्धा होत असते. यावर्षी देखील सन 2023 - 24 मध्ये खालापूर तालुक्यात अशा विविध गावात भात पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये वनवे गावातील हभप कानिफनाथ पारठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध पिकांची नोंदणी केली होती.

कानिफनाथ पारठे यांच्या भात पिकाची निवड होऊन त्यांना या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. त्यांचा नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात कृषी अधिकारी निंबाळकर यांच्या हस्ते कानिफनाथ पारठे यांना प्रशस्तीपत्र, एक वृक्ष व ठराविक रोख रक्कम, सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यामुळे खालापूरसह विविध भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

या स्पर्धेत तालुक्यातून विविध गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. परंतु कानिफनाथ पारठे यांच्या शेतातील दहा बाय दहाचा प्लॉट त्यांच्या निवड प्रक्रियेतून तेवढ्याच रोप भाताची कापणी करून त्या प्लॉटचे एकूण भात 84 किलो असे वजन झाल्याने त्यांचा या स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. त्यामुळे वनवे भैरवनाथ शेतकरी गटामार्फत त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.  शेतकऱ्यासाठी शासनाने असे कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्या ऊर्जेला चेतावणी मिळून त्यांना शेतात असे जोरदार पीक घेण्याची स्फूर्ती मिळेल, याबाबत शासनाने असे कार्यक्रम सतत घेऊन शेतकऱ्यांना संधी देण्याचे काम करायला हवे, असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post