* संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू - प्रदेशाध्यक्ष
* राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे व राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांच्याकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई / प्रतिनिधी :- खालापूर येथील लढवय्ये, निडर, स्वाभिमानी, सच्चे पत्रकार...साप्ताहीक खालापूर वार्ताचे मुख्य संपादक तथा पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी खोपोली, खालापूर, रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात लढा देणारे पत्रकार नेते सुधीर गोविंद माने यांची नुकतीच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे व राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान यांनी पत्रकार माने यांची नियुक्ती केली. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संघटनेच्या तत्वानुसार आपण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहू, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांनी व्यक्त केली.
राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी आपण उभे राहू तसेच शासकीय जाचातून पत्रकारांची सुटका कशी होईल ? यासाठी प्रयत्न करू. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन ही संघटना पत्रकार, संघटनेचे पदाधिकारी यांचा स्वाभिमान कायम ठेवत पत्रकार आणि त्यांचे कुटुंब यांचे आरोग्य...पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता...पत्रकारांना कायदेशीर मार्गदर्शन...पत्रकारांचे घर...पत्रकारांना इन्शुरन्स...पत्रकारांचे शिक्षण व प्रशिक्षण... पत्रकारांना पार्ट टाईम व्यवसायासाठी मदत..पत्रकारांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय महामंडळ...पत्रकारांची नोंदणी...डिजिटल मिडीयाच्या पत्रकारांची नोंदणी...नविन कायद्याबाबत लढा यावर काम करेल, अशी प्रतिक्रिया नूतन प्रदेशाध्यक्ष सुधीर गोविंद माने यांनी व्यक्त केली.
या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण कोळआपटे, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, राष्ट्रीय संयोजक डॉं. शरीफ बागवान, राष्ट्रीय महिला महासचिव मानसी गणेश कांबळे, राष्ट्रीय महासचिव अश्वनी कुमार, राष्ट्रीय सचिव अनिल पवार, सचिव ॲंड. अरविंद कुमार, सचिव धवल माहेश्वरी, राष्ट्रीय सहसचिव लतेश शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉं. अकबर शेख, राष्ट्रीय युवा सचिव फैजान सुर्वे, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा फिरोजा पिंजारी, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षा श्रद्धांजली रॉय, राष्ट्रीय महिला उपाध्यक्षख श्रीमती शानू माहेश्वरी, राष्ट्रीय कमिटी सदस्य किशोर कुमार मोहंती, महाराष्ट्र प्रदेश संयोजक अनिल कुमार पालिवाल, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तनुजा गुळवी, रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र शिवाजी जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन पाटणकर, अकोला जिल्हाध्यक्ष मो. जुनेद मो. युसुफ, ठाणे जिल्हा संयोजक श्रीकांत म्हात्रे, नांदेड जिल्हा महासचिव जावेद अहमद, रायगड जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, रोहा तालुका अध्यक्ष याकुब सय्यद, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रविंद्र सकपाळ, हर्ष कसेरा आदींनी नूतन प्रदेशाध्यक्ष सुधीर माने यांचे अभिनंदन केले आहे.
