दिवे आगार / संदेश पेडणेकर :- सुवर्णं गणेश कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ दिवे आगार यांच्या वतीने दिवे आगार समुद्र चौपाटीवर भव्य बैलगाडी शर्यत 2025 पार पडली. जवळ-जवळ 13 वर्षांनी दिवे आगार येथे ही शर्यत पार पडल्याने नागरीकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. या स्पर्धेत 70 बैलगाडा आणि दहा घोडागाडा यांनी सहभाग नोंदविला होता.
कोकणात बैलगाडा शर्यतीचे मोठे आकर्षण आहे. 13 वर्षांनी दिवे आगार परिसरात बैलगाडा शर्यत होत असल्याने नागरीक व बैलगाडा प्रेमींनी मोठी गर्दी केली होती. या शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी मुरूड येथील प्रसिद्ध उद्योजक महेश पाटील, जितेंद्र कोतवाल, डिवायएसपी सविता गर्जे, एपीआय हनुमंत शिंदे, दिवे आगार सरपंच सिद्धेश कोजबे, गणेश पिलणकर, मंदार तोडणकर, बापट सर, लाला जोशी, मोहम्मद मेमन, प्रकाश ठाकूर आदी उपस्थित होते.
या शर्यतीत रवेश बेलोसे (काशीद), आद्य अमित नाईक (सारळ), योगेश पाटील (बांधन) हे विजयी ठरले. शर्यत पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
