* शिवकालीन युद्ध कला व आखाडा यांचा साक्षात्कार
माळशिरस / प्रतिनिधी :- माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडीत शिव प्रतिष्ठान शिवजयंती उत्सव समिती शिंदेवाडी यांच्यावतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या शौर्य, धैर्य आणि सुव्यवस्थेची गाथा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभर पोहोचल्या आहेत. प्रत्येक वर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात आणि जगभरातील मराठी माणूस जिथे आहे, तिथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
शिंदेवाडीत शिवजयंतीच्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले.19 तारखेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, 20 तारखेला आर्ट ऑफ लिविंग (महासत्संग) शिवगीत व पोवाडा कार्यक्रम, 21 तारखेला होम मिनिस्टर कार्यक्रम तसेच 22 तारखेला शिवप्रतिमेची पारंपरिक मिरवणूक व बालदेखावा शिवकालीन युद्ध कला आखाडा दहिगांव (डॉं. फुले सर) यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक मराठी विद्यार्थ्यांसाठी हा दिवस केवळ उत्सव नसून आपल्या मातृभूमीशी असलेल्या अस्मितेचा आणि शिवचरित्राच्या प्रेरणेचा पुन्हा एकदा साक्षात्कार घडविणारा साक्षात्कारच घडवून आणला.
