अँड. सुभाष खडसन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

पैठण / प्रतिनिधी :- अँड. सुभाष बाबुराव खडसन यांना वकीली क्षेत्रात काम करीत असताना देखील राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये तसेच पैठण भूमीच्या विकासासाठी व पैठण तालुक्यातील भूमीपुत्रांच्या न्याय-हक्कासाठी लढण्याचे भरीव उल्लेखनीय काम केले आहे. या कामगिरीबद्दल रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी व वृत्तपत्र महाराष्ट्र यांच्या ४ वर्धापन दिनानिमित्त ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्णा (जि. परभणी) येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये अँड. सुभाष बाबुराव खडसन यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४ सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post