केव्हीएस ट्रस्टतर्फे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा

* डॉं. कृष्णाकुमार दक्षिणात्य जन्मभूमी ते महाराष्ट्र कर्मभूमीतील शिवभक्त - पत्रकार प्रशांत शेडगे

पनवेल / साबीर शेख :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने स्वराज्यातील योगदानाची आठवण म्हणून प्रीमियर कॉलेज महात्मा गांधी पब्लिक स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा करतांना शौर्य, वैभव, दया आणि औदार्य यांचे प्रतिक असलेल्या शिवरायांवर आधारित कला सादर करीत पथनाट्य, पद्य पाठांतर, निबंध स्पर्धा, गायन, संगीत, नृत्य असे विविध प्रेरणादायी अभिनव उपक्रम इतिहासकालीन पोषाख परिधान नेसून लेझीमच्या तालावर नृत्य व जयघोष करून सर्व शिवप्रेमिकांचे मन जिंकले.

आदर्श शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन विनम्र अभिवादन करून देश, धर्म संस्कृतीविषयी माहिती दिली. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांचा विशेष सन्मान सत्कार करण्यात आला. यावेळी शिवप्रेमी के. व्ही. एस. ट्रस्ट डॉं. कृष्णा कुमार, पत्रकार प्रशांत शेडगे, साबीर शेख, उद्योजक पराग म्हात्रे, अनिकेत बोपाडे, राजन शेलार, निवेदिता चौधरी, निखिल उपाध्याय, प्रवीण शेंडे व ट्रस्टचे व्यवस्थापन मंडळ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post