* बहुजन संकल्प 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
खोपोली / मानसी कांबळे :- साप्ताहिक बहुजन संकल्प आयोजित 10 वा वर्धापन दिन आज महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी खोपोली नगरीचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनिल गोटीराम पाटील, दत्तात्रेय मसुरकर, ताराराणी ब्रिगेड महाराष्ट्र अध्यक्षा वंदनाताई मोरे, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंतशेठ साबळे, शिवसेना कर्जत-खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, खोनप माजी उपनगराध्यक्ष कुलदीप शेंडे, माजी नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, कैलास गायकवाड, कय्युम पटेल, नासिर पटेल, राजेंद्र फक्के, युवा नेते अयाज शेख, शिव उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिश काळे, माजी नगरसेविका केविनाताई गायकवाड, शिवसेना खोपोली शहर कार्याध्यक्ष अनिल मिंडे, शिवसेना नेते राहुल गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख प्रियाताई जाधव, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते अशपाक पटेल आदी उपस्थित होते.
सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. साप्ताहिक बहुजन संकल्पचे मुख्य संपादक तय्यब खान, संपादक आकाश जाधव, सहसंपादक शाहिद शेख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल, प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन स्वागत करण्यात आला. प्रास्ताविक पत्रकार फिरोज पिंजारी यांनी केले. साप्ताहिक बहुजन संकल्पचे मुख्य संपादक तय्यब खान, संपादक आकाश जाधव, सहसंपादक शाहिद शेख यांनी घेतलेल्या परिश्रमातून साप्ताहिक बहुजन संकल्प हे वृत्तपत्र 10 व्या वर्षामध्ये पदार्पण करून यशस्वी वाटचाली करीत आहे, त्याबद्दल शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.
यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिक व संघटनांचा सत्कार करण्यात आला. तसेच शाळकरी विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन (News Journalist Association) या पत्रकार संघटनेचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलिल सुर्वे, राष्ट्रीय संघटक तथा उपक्रम प्रमुख डॉं. शेखर जांभळे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर माने, राष्ट्रीय महिला महासचिव मानसी गणेश कांबळे, जिल्हा सचिव सागर जाधव, खालापूर तालुका अध्यक्ष सुधीर देशमुख, खोपोली शहर सचिव परमेश्वर कट्टीमणी, साप्ताहीक पत्री सरकारचे संपादक सचिन यादव, पत्रकार शिवाजी जाधव, संतोष मोरे, गणेश मोरे, प्रविण कोल्हे, हर्ष कसेरा आदी उपस्थित होते.
न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेच्या संपूर्ण टीमचा यावेळी सन्मानपत्र, शाल आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा तसेच शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील याप्रसंगी सत्कार करण्यात आला. साप्ताहिक बहुजन संकल्प व रायगड संकल्प न्यूज यांच्याकडून अशीच प्रगती वाटचाल सुरु राहत अविरत समाजसेवा, देशसेवा घडत राहो यासाठी मुख्य संपादक तय्यब खान, संपादक आकाश जाधव यांना शुभेच्छा देऊन तसेच कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, मान्यवर, पत्रकार, विद्यार्थी बंधु-भगिनी यांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



