माजगांव ग्राम पंचायतीचा कारभार महिलांच्या हाती

* उपसरपंचपदी अपर्णा शिंदेंची बिनविरोध नियुक्त

* सरपंच दिपाली पाटील सांभाळत आहेत कारभार

खालापूर / दिपक जगताप :- ग्रृप ग्राम पंचायत माजगांव उपसरपंच पदासाठी अपर्णा यशवंत शिंदे व मधुकर गायकवाड यांनी अर्ज दाखल केला होता. यावेळी ग्रामपंचायतीची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती, अखेर गायकवाड यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आल्याने अपर्णा शिंदे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याने सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. या अगोदर उपसरपंच पदाचा कार्यभाग प्रांजळ जाधव हे सांभाळीत होत्या. कार्यकाळ पूर्ण होताच त्यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता.      

ग्रृप ग्राम पंचायत माजगांव सरपंच पद हे महिला पाहत असतांना आता उपसरपंच सुद्धा महिला असल्यामुळे गावातील विकासाची दोरी महिलांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे. यावेळी बिनविरोध उपसरपंचपदी अपर्णा शिंदे यांची निवड झाल्यानंतर ग्रामसेवक संदीप धारणे, सरपंच दिपाली नरेश पाटील, सदस्य पुनम जाधव, सरिता वाघे, वैशाली महाब्दी, वंदना महाब्दी, राजेश पाटील, शशिकांत पाटील आदींच्या उपस्थितीत पदभार स्विकारला.    

अपर्णा शिंदे यांची उपसरपंचपदी निवड होताच फटाक्याच्या अतिषबाजीत चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खालापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जयवंत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते धनाजी पाटील, सामाजिक कार्यकर्ते भगवान जाधव, नरेश पाटील, लायन्स क्लबचे किशोर पाटील, पोलिस पाटील रेश्मा ढवालकर, युवा शिवसैनिक अमित पाटील, एस. के. कांबळे, मंगेश पाटील, यशवंत शिंदे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post