ठाणे / अमित जाधव :- नौपाडा पोलिस स्टेशन गु. क्र. 851/2024 भा. न्या. सं. कलम 331 (4), 324 (2), 305 मधील फियादी पराग बलवंत रावल यांचे अष्टविनायक मोबाईल सेंटरचे शटर उचकटुन कोणी तरी अज्ञात चोरट्यानी रिक्षामधुन येवुन मोबाईल व रोख रक्कम चोरी केली होती. या गुन्ह्याचा तपास सपोनि मंगेश भांगे हे करीत होते.
अप्पर पोलिस आयुक्त विनायक देषमुख, पोलिस उपआयुक्त सुभाष बुरसे, सहा. पोलिस आयुक्त श्रीमती प्रिया ढमाले, वपोनि अभय महाजन, पोनि (गुन्हे) कुंभार यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे तपासी अधिकारी यांनी तपास चालु केला असता या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळावरील तसेच आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गांवरील सुमारे 40 ते 50 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून प्राप्त फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्हयातील आरोपी सलमान शेख व अहमद सिद्दीकी हे उल्हासनगर येथे असल्याची माहिती मिळाली.
या आरोपींची माहिती घेत असताना पोलिसांना गोपनीय बातमीदाराकडुन समजले की, आरोपी हे नौपाडा परीसरात चोरी करण्यासाठी येणार आहेत. पोलिसांनी तीन हात नाका परिसरात सापळा रचुन आरोपी सलमान अली शेख (वय - 21) व अहमद रजा सिद्दीकी (वय-33) यांना अटक करुन त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्यांनी त्यांचे साथीदार साहील कुकरेजा, राजवीर व इम्रान शेख यांच्यासह नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे व घरफोडीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. आरोपी हे रिक्षा, दुचाकी चोरी करतात व त्या चोरीच्या रिक्षा व दुचाकीचा वापर करुन घरफोडी, चोरी करीत असत. या आरोपींकडून एकुण 5,60,000/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.