* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया व टीमला दिली शाबासकी
पुणे / प्रतिनिधी :- दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांची जनसंपर्क प्रमुख या पदावर निवड झाली. साहित्य संमेलनाच्या तयारीसाठी लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची टीम तयार केली, त्या टीममध्ये प्रतिष्ठानचे विश्वस्त संदीप राक्षे भोसरी, विवेक थिटे पुणे, पदाधिकारी रोशन खोब्रागडे नागपूर, विरेंद्र लाटणकर नागपूर, संजय मिसाळ शिरूर, शगिरा शेख हडपसर, शिवानी आबनावे हडपसर, भाग्यश्री वांढेकर अहिल्या नगर यांची निवड केली.
ही सर्व टीम 13 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीला रवाना झाली. दिल्लीत पोहचल्यावर संदीप राक्षे, विवेक थिटे, संजय मिसाळ, रोशन खोब्रागडे, विरेंद्र लाटणकर यांनी दिल्लीतील मराठी उच्च अधिकारी, पदाधिकारी यांना निमंत्रण देण्याचे काम सुरू केले. तसेच दिल्लीत स्थायिक असणा-या मराठी परिवारांना समक्ष भेटून साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची विनंती केली. शगिरा शेख, शिवानी आबनावे, भाग्यश्री वांढेकर यांनी मोबाईल फोनव्दारे संमेलनासाठी उपस्थित राहणा-या नागरिकांना साहित्यिकांना मार्गदर्शन केले. 19 फेब्रुवारी 2025 रोजी 6 जनपथ दिल्ली येथील माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेतली. लक्ष्मीकांत खाबिया यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनातील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिका-यांच्या साहित्यसेवेबद्दलची सविस्तर माहिती दिली. शरद पवार यांनी संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया तसेच प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.