लातूर-उदगीर / प्रकाश केंद्रे :- चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला अशी एक म्हण आहे. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रात वीज पुरविणाऱ्या महावितरणने ही म्हण खरी केली आहे. माहिती अधिकारात सरकारी वीज कंपनीचा एक असा गैरकारभार उघड झाला आहे, की महावितरणला तात्काळ कुलूप का लावू नये असा प्रश्न पडतो.
महाराष्ट्रातल्या ग्राहकांची ही आर्थिक लूट आणि मनस्ताप चिड आणणारा आहे. गेल्या एका महिन्यात 39 हजार बिल तब्बल रुपयांचे वाढीव बिल देण्यात आले होते.
आदर्श गाव देऊळवाडी गावचे रहिवाशी गुट्टे बालाजी बापूराव ते पेंटर आहेत. एक खोली त्यात 1 बल्ब आहे त्यांना 39 हजार रुपये वीज बिल आले. थकबाकीवर 2300 रुपये व्याज लावले. अनेक अर्ज-विनंत्यानंतर गुट्टे बालाजी यांना सहा महिन्यांनी मीटर बदलून मिळाले. पण पुन्हा व्याजासकट फॉल्टी बिल आलेच.
वीज भरणा केंद्रात केव्हाही जा...वीज बिल दुरुस्तीसाठी आलेल्या ग्राहकांची रांग दिसते. खरी चुकी आहे कोणाची रीडिंगवाले की सरकार गोरगरीब लोक महावितरणला जाम वैतागले आहेत.