गुरु लिंगेश्वर पब्लिक मराठी प्रायमरी स्कूलचा स्नेहसंमेलन संपन्न

* 2024-2025 चा आदर्श विद्यार्थी पुरस्कार धनश्री बसय्या मठपतीला प्रदान

खोपोली / प्रतिनिधी :- गुरु लिंगेश्वर पब्लिक एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित मराठी प्रायमरी स्कूल शांतीनगर खोपोली या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

या सोहळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खालापूर पंचायत समिती माजी वरिष्ठ विस्तार अधिकारी खेडकर मॅडम, प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक दिलीप जाधव, एसबीआयचे मॅनेजर मुकेश कुमार, माजी नगरसेविका शिल्पाताई मालकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाला आरपीआय कार्यकर्ते दयानंद सुतार, संस्थेचे सचिव यशवंतराव शंकरराव पाटील, गरड सर तसेच कर्जत-खालापूर तालुका विद्यार्थी संघटना अध्यक्ष संतोष गुडांप्पा म्हेत्रे उपस्थित होते. शांतीनगर व यशवंतनगरचे पालक, माजी विद्यार्थी या सोहळ्यास उपस्थित होते. 2024-2025 या वर्षीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार धनश्री बसय्या मठपती हिला प्रदान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post