* आरएनटी सुधाकर राठोड यांची उपस्थिती
* भारतीय जनता पार्टी ढेकू यांचाही सहभाग
खालापूर / दिपक जगताप :- खालापूर तालुक्यातील ढेकू येथे गेली 13 वर्षे नरेश (दादा) पाटील युवा प्रतिष्ठान यांच्याकडून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये परिसरातील लहान बालके, विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, महिला आदी सहभागी होत असतात. आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खालापूर तहसीलचे निवासी नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर सुप्रसिद्ध भजनसम्राट विशाल बुवा रसाळ व महेश बुवा देशमुख यांनी आपल्या सुमधुर आवाजाने शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील, अशोक सुसलादे, अजित देशमुख, सरपंच विनोद खवले, सरपंच प्रकाश पाटील, सुनील सुखदरे, राजूदादा पाटील, प्रशांत पाटील, साजगाव ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाटील, गणेश नाना पाटील, दिलीप सुखदरे, अजित जाधव, नीतीन पाटील, अनिल पाटील, मोरू आण्णा देशमुख यांच्यासह साजगाव ढेकू पंचक्रोशी विभागातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
