खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर शहरासह वनवे गावात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहराच्या प्रथम नागरिक रोशना नरेश मोडवे, गटनेते किशोर एकनाथ पवार, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीर गोविंद माने, वनवे गावाचे पोलिस पाटील मनोज पारठे, सामाजिक कार्यकर्ते नरेश मोडवे, हभप कानिफनाथ पारठे, राजू पारठे, मच्छिंद्र पारठे, रामचंद्र जाधव, शांताराम पारठे, संतोष पारठे, पांडुरंग मगर, गजानन मोरे, शाखाप्रमुख संदीप पवार, अमित पारठे, पांडुरंग दामू मगर, कृष्णकांत गावडे, वसंत पवार, मोहन घोलप, सचिन घोलप, मधुकर सटू पारठे व गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले, महिलावर्ग आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक पुंडलिक पारठे यांनी केली. प्रथम महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून यथासांग पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव प्रसंगी त्यांच्या आदर्श कारभाराबाबत माहिती दिली. राज्य कारभार कसा पारदर्शक करावा...शासक कसा असावा, याबाबत मनोगत व्यक्त केले. उदाहरण दिले व असा राजा होणे नाही, निश्चयाचा महामेरू, बहुजनांचा आधारु श्रीमंतयोगी असे माझा राज्याचे योगदान अखंड हिंदुस्थान कधीच विसरणार नाही, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

