गेवराई / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांच्या आदेशावरून आरटीई 25 % (टक्के) मोफत प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये निवड झालेली आहे, अशा सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत पूर्ण करून घ्यावा, असे आवाहन कै. चि. ओमकार प्रतिष्ठान राहेरी संचलित इरा मॉंडेल इंटरनॅंशनल स्कूल व ज्युनियर कॉंलेज तलवाडाच्या प्राचार्या मनीषा मोरे यांनी केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, नियमित निवड यादीतील पात्र बालकांच्या पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदविलेली आहेत, त्या सर्व कागदपत्राच्या मूळ प्रति व साक्षांकित प्रति गटशिक्षणाधिकारी कार्यालय गेवराई यांच्याकडे जमा करून प्रवेश निश्चित करून घ्यावा. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गेवराई यांच्याकडून प्रवेश निश्चित झाल्यानंतर अलाऊंटमेंट घेऊन ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे, त्या शाळेत आपला प्रवेश पूर्ण करून घ्यावा. आरटीई 25% मोफत प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 या वर्षाकरीता नियमित निवड यादीतील विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश मुदतीच्या आत पूर्ण करून घ्यावा. प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त होतील, परंतु पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर अर्जाच्या स्थितीवर आपला अर्ज क्रमांक टाकून तपासून घ्यावा. मुदतीच्या आत आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे ही आवाहन प्राचार्या मनीषा मोरे यांनी केले आहे.