बारामती / अक्षय कांबळे :- वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील श्री संत सावता माळी मंदिरात श्री स्वामी समर्थ साप्ताहिक आरती केंद्राच्या वतीने प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे भूपाळी आरती स्वामी चरित्र सारामृत पाठवाचन घेण्यात आले. दुपारी मांदियाळीचा कार्यक्रम झाला. यामध्ये सर्व सेवेकरी घरून तयार करून आणलेल्या अन्नपदार्थाचा सर्व सेवेकरी यांनी आस्वाद घेतला. महिला सेवेकरी संगीता अहिर राव यांनी सर्व उपस्थित सेवेकरी यांना मार्गदर्शन केले. केंद्रातील महिला व पुरुष सेवेकरी यांनी स्वामी सेवेत आल्यानंतर जे काय अनुभव आले, त्यांनी ते सर्वांसमोर अतिशय उत्साहात सांगितले. त्यानंतर प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम झाला.
महिला सेवेकरी यांच्या उपस्थितीत हभप शिवाजी महाराज शेळके अध्यक्ष ज्ञानेश्वर बाल वारकरी शिक्षण संस्था व संत बाळूमामा गोशाळा डोर्लेवाडी संस्थेतील बाल वारकरी यांनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन टाळ मृदंगांच्या गजरात लहान मुलांनी केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा जयघोष करत संपूर्ण गावांमध्ये ग्राम प्रदर्शना घालण्यात आली. यावेळी महिलांनी गावांमध्ये रांगोळी काढली होती. श्री स्वामी समर्थ महाराजांची संध्याकाळची आरती झाली. उपस्थित सेवेकरी यांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी परिसरातील महिला व पुरुष सेवेकरी तसेच बाल सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
