बाप बनला हैवान !

* अत्याचारानंतर गप्प राहण्यासाठी मुलीला 100 रुपये दिले 

नवी मुंबई / प्रतिनिधी :- नवी मुंबईमध्ये बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नराधम बापाने आधी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर 100 रुपये देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बापानेच मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल परिसरात घडली. या प्रकरणी नराधम बापाविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने आपल्या 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध प्रस्थापित करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

त्यानंतर मुलीने गप्प रहावे यासाठी बापाने मुलीला 100 रुपये देऊन प्रकार कुठे सांगू नको असे सांगितले. पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला असता बाप असल्याने याबाबत कुठेही वाच्यता करण्यात आली नाही. 2 दिवसांनी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईने पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. आईच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका झांजुरणे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post