राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या शिक्षक सोसायटीवर प्रा. मनोज देशमुख व अजिज खाटीक यांची निवड

चाळीसगाव / प्रतिनिधी :- येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव या संस्थेच्या शिक्षक कर्मचारी पतसंस्थेची नुकतीच मासिक सभा संस्थेच्या कार्यालयात पार पडली. यावेळी या सभेत स्विकृत तज्ज्ञ संचालक म्हणून राष्ट्रीय ज्युनिअर कॉलेजचे प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख व हिंगोणे विद्यालयातील उपशिक्षक शेख अजिज शेख बशिर खाटीक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

यावेळी देशमुख व शेख यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष भिकनराव देशमुख, मानद चिटणीस सुनिल शेलार, उपाध्यक्ष रोहिदास पाटील, कोषाध्यक्ष प्रा. तुषार चव्हाण व सर्व संचालक बंधू-भगिनी उपस्थित होते. नवनिर्वाचित स्विकृत तज्ज्ञ संचालकांचे राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉं. विनायकराव चव्हाण, सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, उपाध्यक्षा पुष्पाताई भोसले, सहसचिव रावसाहेब साळुंखे व आर्किटेक्ट धनंजयराव चव्हाण यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post