दिव्यातील आदर्श विद्यालय शाळेत फूड फेस्टिव्हल संपन्न

* विद्यार्थ्यांनी बनविले वेगवेगळ्या पद्धतीचे खाद्यपदार्थ

ठाणे / अमित जाधव :- आदर्श विद्यालयात खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दिवा येथील आदर्श शाळेतर्फे शनिवारी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवून विविध पदार्थ तयार केले. ज्याचे शाळेतील शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले.  

दिवा पूर्व येथील बी.आर.नगर जवळील आदर्श विद्यालयाने शिक्षण क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या माध्यमातून वेळोवेळी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धांत्मक भावना निर्माण होईल. शाळेचे विश्वस्त व मुख्याध्यापक अमित मिश्रा यांनी सांगितले की, फूड फेस्टिव्हलमध्ये विद्यार्थ्यांकडून पदार्थ तयार करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अमित मिश्रा, स्मिता पाटील, शशिधर चतुर्वेदी, सपना शुक्ला, प्रियंका मांडवकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फूड फेस्टिव्हलच्या यशस्वी आयोजनानंतर मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे आभार व्यक्त करून अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण होते व विद्यार्थी आत्मनिर्भर होऊन कार्यकुशल बनतात असे स्पष्ट केले तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले उशिरापर्यंत उपक्रमाची रेलचेल सुरु होती.

Post a Comment

Previous Post Next Post