* आधी पण बापाला टोपी देत केले होते बापाचे अकाऊंट खाली
* नवे-नवखे मुलांना कमी वेळात जास्त पैसे कमवायचे अजब आकर्षण
नागपूर - सिर्सी / अखिल रोडे :- टीव्ही, मोबाईलवर सतत दिसणाऱ्या जाहिराती त्याही ऑनलाईन जुगार, जंगली रमी, कधी काही तर कधी काही अशा अनेक जुगार जाहिराती टीव्ही, मोबाईलवर सुरू असतात. त्या जाहिरातीत नामवंत सिनेकलाकार, क्रिकेटपट्टू यांना समावेश असल्यामुळे ऑनलाईन सट्ट्याचे क्रेझ वाढत जात आहे. अश्याच जाहिरातीतील क्रिकेट प्रेमीला आदर्श मानत सिर्सी येथील हर्ष अविनाश निखार हा युवक ऑनलाईन जुगार खेळायला लागला. सुरूवातीला त्याला त्यातून चांगला मुनाफा मिळायचा त्यात त्याने जादा पैसे कमविण्याच्या नादात वडिलाचे बँक अकाऊंट मोबाईलमध्ये सुरू करून ऑनलाईन व्यवहार करायचा. या गावातील पुन्हा 3-4 युवकांना अशाच ऑलाईनवरील सट्टा खेळाचा नाद आहे, अशी गावात चर्चा आहे.
5 फेब्रुवारी 2025 रोजी फिर्यादी अविनाश महादेव निखार यांच्या प्राथमिक रीपोर्टनुसार 70 हजार रुपये सोने व दागिने चोरी गेल्याचे सांगण्यात आले. यानुसार सिर्सी पोलिस चौकी येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्ह्याची नोंद करीत बेला पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी निलेश बिजवाड व अमोल कोटेवार यांनी फॉरेन्सिक व्हॅन आणि डॉगस्कोड यांच्या मदतीने चोरी झालेल्या जागेवरील पंचासमक्ष फिंगरप्रिंट घेण्यात आले. चोरी करणारा कुणी घरचाच आहे, असे त्यावरून निष्पन्न झाले.
फिर्यादी यांच्या मुलाला ऑनलाईन जुगार खेळण्याचा नाद आहे. पो. ह. निलेश बिजवाड व पोलिस नायक अमोल कोटेवार यांनी पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता हर्ष निखार यांनी ऑनलाईन जुगार हरल्यामुळे घरीच चोरी केल्याचे कबूल केले. ही कारवाई अपराध क्र. 33/25 कलम 305 (अ ) भा. न्या. स. कायदा अन्वये पोलिस स्टेशन बेला येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ, सहा. पोलिस अधिक्षक नागपूर दिपक अग्रवाल, बेला पोलिस स्टेशन ठाणेदार सी. बी.चौहान, पो. उनि. खंडेराव बोळगिर, पो. ह. निलेश बिजवाड, दारासिंग राठोड, अमोल कोटेवार, पंकज कोहाड, प्रविण नैनवार, अविनाश उप्परे यांनी केली.
या ऑनलाईन जुगारात गावातील 3-4 युवक जुळून असल्याची चर्चा गावात होत आहे. समोरचा तपास सिर्सी पोलिस चौकीचे इन्चार्ज निलेश बिजवाडसोबत अमोल कोटेवार, अमोल काळे करीत आहेत.
