क्रिडामंत्री दत्तामामा भरणे याच्यांकडे पोहचला शतकोनचा प्रश्न

* आरपीआय नेते यांनी मांडली कराटे इमारतीची गरज

* युवानेते तुषार कांबळेंनी घेतली क्रिडामंत्री यांची भेट 

* शितलताई गायकवाड यांच्या कष्टाला मिळणार फळ 

खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली शहरासह खालापूर तालुक्यातील मुलामुलींना कराटे प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर, स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय खेळाडू कैप्टन भारत भूषण शितलताई गायकवाड करीत आहेत. पण खोपोली शहरात शतकोन कराटे स्पोटर्स असोसिएशनची इमारत नसल्याने शितल गायकवाड यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी कला क्रिडा व युवक कल्याण मंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेवून हा प्रश्न मांडला. 

क्रिडामंत्री भरणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कैप्टन शितल गायकवाड या शतकोन कराटे स्पोटर्स असोसिएशनच्या इमारतीकरीता अनेक वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. शितल गायकवाड यांना भारत भूषण अवॉर्ड, स्पोटर्स ॲचिव्हमेंट अवॉर्ड, सुपर ह्युमन लेडी, दादासाहेब फाळके अवॉर्ड, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, राजमाता जिजाऊ पुरस्कार, स्पोटर्स ह्युमन पर्सन अवॉर्ड, भारतरत्न डॉं. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, इंटरनॅशनल हेल्थ केअर अवॉर्ड, कॉमन वेल्थ एक्सलेन्स अवॉर्ड, ह्युमन इंटरप्रायजेस अवॉर्ड, महात्मा गांधी ग्लोबल इन्हिसिर्टी स्पोटर्स (मार्शल आर्ट) आदी विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसेच शितल गायकवाड यांनी रायगड जिल्ह्यामधील खोपोली, खालापूर येथील अनेक तरूणांना डिस्ट्रिक्ट, स्टेट, नॅशनल, इंटर नॅशनल खेळाडू तयार केले आहेत.

आगामी काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू तैयार करण्याच्या उद्देशाने शतकोन कराटे स्पोटर्स असोसिएशनला इमारतीची गरज आहे. शितल गायकवाड यांनी बांधकामाकरीता कर्जत-खालापूर विधानसभा आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्याकडून निधी मंजूर करवून  घेतला आहे. परंतु अजून इमारत उभी राहिली नसल्याने मुलांना कराटे हा खेळ खेळण्याकरीता प्रचंड प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. आमदार महोदयांनी नगर परिषदेला सुचना दिल्यानंतरही सदरहू काम पूर्ण होऊ शकलेले नाही. इमारतीचे काम अर्धे झालेले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आपण नगर परिषद प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली. याप्रसंगी कैप्टन भारत भूषण कमांडर शितल गायकवाड, कृष्णाई महाडिक, तुषार कांबळे यांचे सहकारी राहुल मंगळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post