खालापूर / सुधीर देशमुख :- मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रायगड जिल्ह्यातील पत्रकार तथा दैनिक बेधडक महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक अभिजीत दरेकर यांची ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या भव्य सोहळ्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा, आ. हेमंत पाटील, बँकर, गायिका व सामाजिक कार्यकर्त्यां अमृता फडणवीस, सिनेअभिनेते जॅकी श्रॉफ, कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल, माहिती व जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह, लाईफस्टाईल कोच, कथाकार आणि लेखक डॉं. शुभ विलास आदी उपस्थित होते.
या निवडीबद्दल रघुनाथ कडू, किरण मोरे, रोहन कडू, सुधीर देशमुख, दीपक जगताप, कृष्णा सगणे, गणेश लोट, संकेत घेवारे, संदेश साळुंके, श्रेयस ठाकूर, महेंद्र आव्हाड यांसह अनेक पत्रकार व मान्यवरांनी अभिजीत दरेकर यांचे अभिनंदन केले.