* आमदार साहेबांचे धन्यवाद आणि आभार
* नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम
खालापुर / सुधीर देशमुख :- तांबाटी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणूक आज पार पडली आणि पक्षाने आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यामुळे मी आज उपसरपंच झालो याचा आनंद आहे. कारण मी सुरुवातीलाच व्हायला हवे होते पण माझ्याकडे संयमी वृत्ती आहे आणि साहेबांनी मला दिलेला शब्द आणि पूर्ण केला. मी व्यक्तिशः आमदार साहेब यांचा ऋणी आहे. कधी ही संयम ठेवला आणि निष्ठावान राहिले की त्याचे फळ उशिरा का असेना पण ते मिळते आणि माझ्या पक्षनेतृत्वाने म्हणजेच आमचे सर्वेसर्वा आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी माझे तोंड मला उपसरपंच पद देऊन गोड केले याचे मनस्वी आनंद आहे तर दुसरीकडे हे पद मिळण्यासाठी उशीर झाला, माझा दावा असताना मला थांबावे लागले आणि त्यावेळी आणि आत्ता यावेळी संघर्ष करावा लागला पण हरकत नाही अनुभवातून मी खूप काही शिकलो पण मी माझी विकास संकल्प सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित उपसरपंच नितीन कदम यांनी व्यक्त केली.
कदम पुढे म्हणाले की, नक्कीच आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत विकासासाठी नंबर वन करणार आणि राहिलेली कामे, अपूर्ण कामे, प्रलंबित, प्रस्तावित कामे यासह जनतेला नेमके काय हवे तेच विकासाचे धोरण सरपंच, सदस्य यांना सोबत घेऊन आम्ही सर्वजण पुढील काळात तो विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित तांबाटी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच नितीन गजानन कदम यांनी व्यक्त केली.
माझ्यामागे आमदार साहेबांचे आशिर्वाद आणि भरभक्कम साथ आहे. त्यामुळे किरकोळ तक्रारी करणारा मी व्यक्ती नाही, त्यामुळे आमच्या आमदार साहेबांचे नेतृत्व इतके सक्षम आहे की कोणी कितीही वाटेत काटे पेरण्याचे काम अविरत जरी सुरु ठेवले तरी त्याची काल, आज आणि उद्या पर्वा नाही, असेही मोठ्या आत्मविश्वासाने नितीन कदम यांनी निक्षुन सांगितले.
