स्वारगेट येथे महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कडक कार्रवाई करा !

* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी

* बारामती पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर 

बारामती / अक्षय कांबळे :- बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज बारामती पोलिस निरीक्षक विलास नाळे यांना निवेदन देण्यात आले. स्वारगेट बसस्थानक पुणे येथे २६ वर्षीय महिलेला आरोपी दत्तात्रय गाडे याने गोड बोलून व तिला फसवून एका बाजूला लावलेल्या सांगोला डेपोच्या शिवशाही बसमध्ये एकांतात नेऊन बसचा दरवाजा लावून तिच्यावर अत्याचार केला, तरी ही घटना निंदनीय असून अशा कृत्यामुळे महिला वर्गांत सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे व त्यांच्यामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे, तरी संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला अध्यक्षा वनिता बनकर, शहराध्यक्ष आरती शेंडगे, युवती अध्यक्षा प्रियंका शेंडकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पैगंबर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार काळे, सोशल मिडीया जिल्हा सरचिटणीस राणी नवले, माळेगाव नगर पंचायत अध्यक्ष नितीन तावरे, लीगल सेलच्या अध्यक्षा वृषाली बांदल, युवक तालुका उपाध्यक्ष विठ्ठल करे, ओबीसी सरचिटणीस माया खुंटे, कल्पना परगेस, दिपाली पवार, शिल्पा शिरवळे, अक्षय कांबळे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post