ग्लोबल शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवले फिरते वस्तुसंग्रहालयाचा आनंद

* इतिहास आणि संस्कृती हे विषय गंमतीशीर पद्धतीने समजावले

ठाणे / अमित जाधव :- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे फिरते वस्तुसंग्रहालय आज दिवा शहरातील ग्लोबल इंग्लिश स्कुलमध्ये दाखल झाले होते. शालेय विद्यार्थ्यांना वस्तुसंग्रहालयाची महिती व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला जात आहे. दिव्यातील ग्लोबल शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी या फिरत्या वस्तुसंग्रहालयाचा अनुभव घेतला. लहान मुलांना इतिहासाची ओळख होताना दिसून येते. 'म्युझियम ऑफ व्हील्स' या बसची संपूर्ण रचना एखाद्या छोट्या वस्तुसंग्रहालयासारखी असून ती संपूर्ण वातानुकूलित आहे. शिवाय काचेच्या पेट्या, माहिती संच, दृकश्राव्य साधने आणि टच स्क्रीन डिजिटल टॅबलेट्ससारखी उपकरणे यामध्ये आहेत. या निमित्ताने ज्या ठिकाणी 'म्युझियम ऑफ व्हील्स' जाईल तिथे विविध कार्यशाळा आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांमध्ये इतिहासाची आवड निर्माण करणे, त्यांच्या ज्ञानात भर पाडणे आणि त्यांची जिज्ञासा जागृत करणे हे या 'म्युझियम ऑफ व्हील्स' सुरू करण्यामागचे उद्दिष्ट आहे.

फिरते म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा एक अग्रगण्य उपक्रम आहे. जो या इमारतीच्या पलीकडे जावून मुंबई उपनगर, महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत भाग आणि दूरवरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी विकसित केलेला आहे. या विशिष्ट प्रकारच्या बसमध्ये तीन हजार वर्षांपूर्वीचा भारत, पश्चिम आशियाई व त्यानंतर इजिप्त, ग्रीस, रोम, असिरिया शिल्प कलाकृतीच्या निवडक प्रतिकृती या विषयीची संपूर्ण माहिती आहे. याशिवाय इंटर ऍक्टिव्ह, डिजिटल व स्वतः तयार करून पहावयाच्या ऍक्टिव्हिटीज शीट्स व माहिती पत्रके आहेत. त्यानुसार या मुलांना प्रत्यक्ष करून पाहता येतात. इतिहास आणि संस्कृती हे विषय गंमतीशीर पद्धतीने दाखविले जातात यावेळी म्युझियमच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी बोलतांना स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post