* संदीप पाटील यांची महावितरणात मुख्य अभियंता (वाणिज्य) पदी निवड
खोपोली / दत्तात्रेय शेडगे :- महावितरणात (एमएससीबी) संदीप सुरेश पाटील यांची मुख्य अभियंता म्हणून नुकतीच सरळसेवा भरती अंतर्गत निवड झाल्याने आगरी समाजात पहिल्यांदाच आणखी एक मानाचा तुरा मिळविला असून आगरी समाजात पहिल्यांदाच मुख्य अभियंता होण्याचा मान मिळविल्याने सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
संदीप सुरेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणात काम करीत आहेत. ते सतत महावितरणाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवून नेहमी काम करीत आहेत.
महावितरणमध्ये काम करताना कधी कधी कठोर भूमिकाही घेतली आहे. महावितरणकडून त्यांनी आंतरराज्यीय पारेषण शुल्क निश्चित करण्यासाठी असलेल्या विद्युत नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्यामुळे महावितरण कंपनीला अनेक कोटींचा दरमहा बचत होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी महावितरण कंपनीचा आर्थिक वर्ष 2018-19 साठी उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरविले आहे.
संदीप पाटील यांची अत्यंत हुशार, शांत, संयमी आणि अभ्यासू अभियंता म्हणून ओळख आहे. संदीप पाटील हे रायगड जिल्हातील पेण तालुक्यातील असून वयाच्या पंचेचाळीस वयात त्यांनी हा मान मिळवला आहे. मुख्य अभियंता म्हणून निवड होण्यापूर्वी ते महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते. ते आगरी समाजातील महावितरणमध्ये काम करणारे पहिले अधीक्षक अभियंता सुध्दा आहेत.