पटेलस् आर मार्टच्या वतीने भव्य चित्रकला

* स्पर्धेत 1500 बालचित्रकारांचा सहभाग

ठाणे / अमित जाधव :- शिवजयंती उत्सवानिमित्त ग्राहकांच्या मानात घर करणा-या पटेलस् आर मार्टच्या वतीने भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पटेलस् आर मार्टच्या विविध २० शाखांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. या चित्रकला स्पर्धेत १५०० पेक्षा जास्त बालचित्रकारांनी सहभाग घेतला होता. गाथा शिवरायांची या विषयावर चिमुकल्यांनी अत्यंत आकर्षक आणि अचंबित करणा-या महाराजांच्या सुंदर चित्रकृती रेखाटल्याचे दिसून आले.

लहान वयातच छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संस्कार झाले पाहिजेत व मुलांना महाराजांचे कार्यकुशल व बुद्धिमत्ता गुण आत्मसात व्हावे या उद्देशाने पटेलस् आर मार्टचे संचालक भरत पटेल यांच्या संकल्पनेतून, पटेलस् आर मार्टच्या सर्व शाखांमध्ये शिवजंयती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी पटेलस् आर मार्टच्या सर्व कर्मचाऱ्यांनी पारंपारीक पोषाखात उपस्थित राहून शिवजयंती निम्मित ग्राहकांना देखील आकर्षित केले व मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. याप्रसगी आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना चित्रकलेसाठी लागणा-या ब्रँडेड वस्तूंचे गिफ्ट देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post