कर्जत येथे घरकुल योजनेची पाहणी आणि महसुल वसुली आढावा

* प्रधान सचिव डवले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बास्टेवाड यांची उपस्थिती

कर्जत / प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासनाच्या १३ जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या विशेष उपक्रमांतर्गत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव डवले आणि रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉं. भरत बास्टेवाड यांनी कर्जत तालुक्यातील विविध विकासकामांची पाहणी केली.   

यावेळी कर्जत पंचायत समिती तसेच ग्रुप ग्रामपंचायत उमरोली येथे प्रधानमंत्री आवास योजना आणि जनमन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल प्रकल्पांची पाहणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तसेच, ग्रामपंचायत नेरळ येथे घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेण्यात आला. महसूल वसुली वाढीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.  

या दौऱ्याच्या प्रसंगी पंचायत समिती कर्जतचे सहाय्यक गटविकास अधिकारी प्रभाकर बोरकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी उज्ज्वला भोसले, प्रशासक सुजित धनगर, ग्रामपंचायत अधिकारी तसेच घरकुल विभागाचे अभियंते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post