कर्जतमध्ये भव्य महाआरोग्य शिबिर संपन्न


* आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांचा उपक्रम 

कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन कर्जत-खालापूर मतदारसंघाचे आ. महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता शिवतीर्थ हॉल, पोसरी (ता. कर्जत) येथे झाले. या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमासाठी नितीन शहा, नीना ठक्कर, किशोर मसुरकर, हरीश सहानी व रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये मोफत तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन करण्यात आले. डोळे, दंतचिकित्सा, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, हाडांचे आजार व सर्जरीबाबत सल्ला देण्यात आला. महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. चष्मे, औषधे व सॅनिटरी पॅड्स या प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा मोफत देण्यात आल्या.

या कार्यक्रमप्रसंगी बोलताना किशोर मसुरकर यांनी आ. महेंद्र थोरवे यांनी आम्हाला ही लोकसेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच हिंदू हृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची याप्रसंगी आठवण झाली. श्रीमान बाळासाहेब ठाकरे ज्या पद्धतीने समाजहिताचे निर्णय घेत असत, त्याच तत्त्वाने आ. महेंद्र थोरवे कार्य करतात व समाजप्रती त्यांची तितकीच कळकळ आणि बांधिलकी आहे, असे त्यांनी सांगितले.

आ. महेंद्र थोरवे म्हणाले की, समाजाच्या आरोग्यविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा सेवा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, भविष्यातही समाजहिताचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात राबवले जाईल, असा विश्वास आ. थोरवे यांनी व्यक्त केला. 

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट यांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी किशोर मसुरकर, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सिकोस्ट आणि संपूर्ण टीम यांचे विशेष आभार मानण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कर्जत-खालापूर मतदारसंघातील नागरिक, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post