श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन साजरा

कर्जत / जयेश जाधव :- मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठी भाषा दिन, कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला जातो. दरम्यान, मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून कर्जतमधील श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त कर्जतमधील साहित्यिक आणि पत्रकारांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर सुचिता जोगळेकर, श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय संस्थेच्या कार्याध्यक्षा गायत्री परांजपे, कोषाध्यक्ष  सुधाकर निमकर, सहकार्यवाह सदानंद जोशी, जेष्ठ सदस्य पद्माकर गांगल आदी उपस्थित होते. मराठी भाषा दिनानिमित्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक दिलीप गडकरी, माधव भडसावळे, संजय वझरेकर, केतन गडकरी, अरुण गांगल, श्रीमती मीरा वैद्य तसेच पत्रकार जयेश जाधव, बाळू गुरव, सुभाष सोनवणे, प्रशांत खराडे, नरेश जाधव आणि प्रभाकर गंगावणे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कर्जत शिशु मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

यावेळी वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध समुह गीते, समृह नृत्य सादर करीत विद्यार्थ्यांनी हातात फलक धरून मराठी भाषेचे गुणगान केले. यावेळी अच्युत कोडगिरे, सुरेश खैर तसेच शिशु मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता निमकर, ताराराणी ढोले, मंजुषा सोनावळे, प्रीती पारठी, उल्का सुतार, प्रज्ञा तेलवणे, सुरेखा साळवी आदी नागरिक व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ग्रंथपाल रामदास गायकवाड, सहाय्य ग्रंथपाल योगिता साखरे, लिपिक श्रीराम गांगल, वनिता गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post