आर्ट ऑफ लिविंग टीम शिंदेवाडी यांच्या वतीने एनएमएमएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान

माळशिरस / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत एनएमएमएस (NMMS) ही परीक्षा जिल्ह्यातील विविध केंद्रावर 22 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून या परीक्षेसाठी रयत शिक्षण संस्थेचे हनुमान विद्यालय शिंदेवाडी येथील 47 विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते. त्यापैकी  20 विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेले आहेत. केंद्रीय शिष्यवृत्तीस पात्र होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांस दरमहा रूपये 1000/- (वार्षिक रुपये 12000/- ) शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच सारथी शिष्यवृत्तीस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यास वार्षिक रुपये 9600/- शिष्यवृत्ती दिली जाते.

हनुमान विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिंदेवाडी या शाळेच्या इयत्ता ८ वीमधील विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी एनएमएमएस (NMMS) परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केल्याबद्दल शनिवार 15 फेब्रुवारी 2025 रोजी शाळेमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक यांचा आर्ट ऑफ लिविंग टीम, शिंदेवाडी यांच्यातर्फे सत्कार घेण्यात आला. 

व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच मार्गदर्शक शिक्षक यांचाही सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांचे विभाग प्रमुख फिरोज मुलाणी (गणित), परमेश्वर सूर्यवंशी (बुद्धिमत्ता), शरद पाटोळे (विज्ञान), विजय पोटरे (सा. शास्त्र), बाळासाहेब क्षीरसागर (सा. शास्त्र) यांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षिका मिताली देठे मॅडम, प्राचार्य दादासाहेब आकाडे, आर्ट ऑफ लिविंग टीम शिंदेवाडी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भुजबळ सर यांनी केले. शिक्षक मनोगत मुलाणी सर तसेच पालक मनोगत बागल मॅडम यांनी मानले. आभार भंडारे सर यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post