हिंगोणे विद्यालयात रंगला ३५ वर्षांच्या स्नेहोत्कर्षाचा सोहळा

* पुन्हा शाळेत येऊन रमावे - आ. मंगेश चव्हाण

चाळीसगाव / प्रतिनिधी :- येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय हिंगोणे येथे शाळेच्या स्थापनेपासून १९८८ ते २०२४ अशा ३५ वर्षातील सर्व माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा विद्यालयाच्या वतीने स्मृतिगंध या नावाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ चाळीसगाव या संस्थेचे चेअरमन डाॅं. विनायकराव चव्हाण यांनी भूषविले. स्नेहमेळाव्याचे उद्धघाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव प्राचार्य बाळासाहेब चव्हाण, सहसचिव रावसाहेब साळुंखे, संचालक आर्किटेक्ट धनंजयराव चव्हाण, संचालिका उज्वला पाटील, माजी प्राचार्य पी. एस. चव्हाण, एस. डी. पाटील, राकेश  बोरसे, माजी मुख्याध्यापक वा. गो. माळी, बी. बी. वाबळे, डी. एल. साळुंखे, टी. बी. चव्हाण, वाय. बी. भामरे व माजी  शिक्षक पी. एन. अमृतकार, एस. बी. चव्हाण, जी. के. चव्हाण, आर. व्ही. वाबळे, एस. आर. शेलार, पी. व्ही. पाटील, व्ही. एल. पाटील, एस. वाय. पाटील, जी. पी. कवळासे, एल. के. चव्हाण, जे. डी. पवार, बी. जे. पवार, बी. डी. पाटील, सी. व्ही. चौधरी, एम. बी. देशमुख, सरपंच दिपक चव्हाण, भाऊसाहेब गायकवाड, पोलिस पाटील राजेंद्र कोष्टी, ज्ञानेश्वर महाजन, शांताराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील नववीच्या विद्यार्थ्यांनींनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच शिक्षणमहर्षी स्वर्गीय नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी शाळेतील गतस्मृतिंना उजाळा देतांना गुरुजनांप्रती आदर तथा कृतज्ञता भाव व्यक्त केला तसेच विद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा मानस व्यक्त केला व परत २४ वर्ष मागे जावून विद्यार्थी व शिक्षकांसोबत रमावे व १५ दिवस शाळेसाठी द्यावे असे सांगितले.तर संस्थेचे चिटणीस प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी विद्यालयाची गौरवशाली परंपरेचा आणि यशवंत विद्यार्थी यांच्या प्रगतीसंबधी समाधान व्यक्त केले आणि पुढील काळात लौकिक कायम ठेवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांनी अपेक्षा व्यक्त केली. स्वागताध्यक्ष विद्यालयाचे  मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांनी स्वागतपर विचार व्यक्त करुन विद्यालयाचा वारसा असाच पुढे नेऊ असे आश्वासित केले.

उपशिक्षक ए. टी. पवार यांनी प्रास्ताविक तर उपशिक्षक ए‌. बी. शेख यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करुन दिला. माजी विद्यार्थी मंत्रालयातील निलेश चव्हाण, पोलिस दलातील नरेंद्र विसपुते, प्राचार्य हरेश पाटील, शिक्षक भगवान चव्हाण, समाधान अहिरे, भारती पाटील, वर्षा पाटील, एकनाथ पाटील, नंदकुमार चव्हाण, अतुल बागुल यांनी भावस्पर्शी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी यांचा यथोचित सन्मान विद्यालयातर्फे करण्यात आला. माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेटवस्तू तथा शाळा समृद्धी उपक्रमाअंतर्गत रोख स्वरुपात योगदान दिले. शालेय परिसर सजावटीसाठी  कलाशिक्षक पी. व्ही. पाटील यांनी सुरेख फलक लेखन तर जी. पी. कवळासे यांनी रांगोळी रेखाटन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षक बी.व्ही. चव्हाण, जे. जी. शेलार, सी. बी. सोनवणे,  पी‌. जे. देशमुख, ए. एस. पाटील, ए. बी. कोतकर व बी. एस. बोरसे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन व सुत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. आर. देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षक एम. एस. पाटील यांनी व्यक्त केले, कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर, माजी शिक्षक व माजी विद्यार्थी तसेच पालक यांना मुख्याध्यापक डी. पी. पाटील यांनी उपस्थितीबद्दल धन्यवाद दिलेत व स्नेहभोजनानंतर शेकडो विद्यार्थी व शिक्षकांचा ३५ वर्षांतील ३५ वर्गांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.

माजी विद्यार्थी एकनाथ पाटील यांच्यातर्फे माजी विद्यार्थी व शिक्षक यांना संत तुकाराम यांची मूर्ती भेट देण्यात आली तसेच माजी विद्यार्थ्यांकडून सर्व प्रमुख अतिथी व शिक्षक तसेच विद्यार्थी यांना फेटे बांधून सन्मान दिला गेला व विद्यालयातील सर्व स्टाफतर्फे उपस्थित सर्वांना स्नेहभोजनाचे आयोजन करुन स्मृतिगंधच्या आठवणी म्हणून विद्यालयातर्फे किचेन भेट देण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या विकासासाठी योगदान देण्याचा मानस सर्व माजी विद्यार्थी व माजी शिक्षक व माजी मुख्याध्यापक यांनी व्यक्त केला तसेच ३५ वर्षांच्या विद्यार्थी व शिक्षकांना एकत्र करीत स्नेहमेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉं. विनायकराव चव्हाण यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व सहकारी यांचे कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post