अकोला / मोहम्मद जुनेद :- महाराष्ट्र ॲथलेटीक्स असोसिएशन व्दारा आयोजित राज्य सब ज्युनिअर ॲथलेटीक्स स्पर्धा 23 आणि 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. यासाठी अकोला जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन अकोला अॅथलेटिक्स असोशिएशनद्वारा 10 फेब्रुवारी 2025 रोजी वसंत देसाई स्टेडिअम रेल्वे स्टेशन रोड अकोला येथे करण्यात आले होते.
14 वर्ष वयोगटासाठी 80 मीटर व 300 मीटर धावणे, लांब उडी, गोळा फेक...12 वर्ष वयोगटासाठी 60 मीटर व 300 मीटर धावणे, लांब उडी व गोळा फेक...10 वर्ष वयोगटासाठी 50 मीटर व 100 मीटर धावणे, लांब उडी व गोळा फेक व 8 वर्ष वयोगटासाठी 50 मीटर व 100 मीटर धावणे, लांब उडी अशा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये अकोला जिल्ह्यातील 200 मुले व मुली यांनी सहभाग नोंदविला होता. तत्पूर्वी ह्या स्पर्धेचा उदघाट्न सोहळा पार पडला. यावेळी पवन महल्ले, राम बोंद्रे, अकोला अॅथलेटिक्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रमोद गुप्ता, अथर हुसैन, संदिप ढोके, बंटी सपकाळ, नलिनी करंडे, गणेश मार्के, नितिन शेलार आदी उपस्थित होते. या स्पर्धेत विराट पारवेकर, श्रेया पवार, रानु खांझोडे, देवांशर रामागडे, डिम्पल दळवी, आर्यन बयस आदींना महाराष्ट्र ॲथलेटीक्स असोसिएशन व्दारा आयोजित राज्य सब ज्युनिअर ॲथलेटीक्स स्पर्धेत अकोला जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
