खालापूर / प्रतिनिधी :- शिवसेना प्रमुख नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारच्या राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत रायगड जिल्हा परिषद लघु पाटबंधारे उपविभाग कर्जत विभागाच्या माध्यमातून खालापूर तालुक्यात 16 कोटी रुपये खर्चून जलसंधारण प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न झाले.
रविवार, 9 फेब्रुवारी 2025 रोजी आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. खानाव, खरीवली, गोहे, गोरठण, होराळे, परखंदे, वावोशी आणि वडवळ या गावांमध्ये या योजनेमुळे तलावांचे पुनर्जीवन होऊन गावांमध्ये पर्यावरणस्थळ विकसित होणार आहे, त्यामुळे गावाच्या आणि तालुक्याच्या लौकिककात भर पडणार आहे.
यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे. कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
