* ब्लू बेल्सचे विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर झाले महान
नायगांव / शिवाजी पांचाळ :- ब्लू बेल्स शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पाचवी ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना अबॅकस घेण्यात आले होते. अबॅकसमुळे विद्यार्थी कमी वेळात जास्तीत जास्त गणित सोडवितो, गणिताबद्दल ओढ निर्माण होते. यात त्यांनी आपले कौशल्य राज्यस्तरावर दाखविले तसेच 2024-25 मध्ये शाळा स्तरावर अबॅकसचा सराव घेऊन काही निवड विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी करण्यात आली होती.
जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय पातळीवर यांची निवड झाली आहे. यामध्ये कर्नाटका, तेलंगाना आणि महाराष्ट्र अशा तिन्ही राज्यातील 425 शाळेमधून अबॅकस तिसरा लेवल, अबॅकस दुसरा लेवलमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. आविर बालाजी पाटील, अर्जुन सुरेश राठोड या विद्यार्थ्यांनी शंभर प्रश्न 1 मिनिटे 23 सेकंदात सोडवली. ब्लू बेल्स इंग्लिश स्कूलने सलग दुसऱ्या वर्षी मिळविलेल्या हा विजय अभिमानास्पद असून शाळेने शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणारे डॉं. साईदीप्ती कोपोलू, सुनंदा मामिडवार टीचर, गीता पांचाळ टीचर, सिद्धार्थ सर, स्वप्निल सर, तानाजी सर, नागेश सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सीता महालक्ष्मी, संस्थापक अध्यक्ष व शरदचंद्र कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉं. के. हरी बाबू हे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.