* संस्थापक अध्यक्ष देवदास डोंगरे यांनी केले सभासदांना मार्गदर्शन
खोपोली / दत्तात्रय शेडगे :- साई प्रेरणा को. ऑंप पतसंस्थेचा खोपोली शाखेचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवदास कोंडाजी डोंगरे हे उपस्थित राहून सभासदांना मार्गदर्शन करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. साई प्रेरणा पतसंस्था खोपोली शाखेचा सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला असून यावेळी संस्थापक देवदास डोंगरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
आर्थिकदृष्टया गोरगरीब कुटूंब आहे. त्यांना व्यवसायासाठी लागणारे आर्थिक मदत करण्याच्या उद्धेशाने ही संस्था वेळोवेळी मदत करत असते. एखादी व्यक्ती खाजगी व्यक्तीकडून जास्त व्याजदराने पैसे घेतात आणि ते दिवसेंदिवस कर्जबाजारी होतात अश्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या संस्थेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते, जेणेकरून महिलांनी व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन कुटूंबाला हातभार लागेल हा एकमेव संस्थेचा उद्देश आहे.
संस्थापक अध्यक्ष देवदास डोंगरे यांनी खोपोली आणि पेण येथील सभासदांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करून कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष देवदास कोंडाजी डोंगरे, खोपोली शाखा अधिकारी कल्पेश अनिल भोपतराव, प्रकाश उकाजी आठवले, गौरव मोरे, रोहित कराळे आदींसह अनेक सभासद आणि कर्जदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
